आम्ही मागील महीन्यात पाहूण्याची शेती पाहण्यासाठी गेलो होतो . मका, कापूस , कांदा , वांगी अशि चांगली पिके उभी होती शेती करणारे कुटुंब सुद्धा होते माझ्या पत्नी ने त्यांच्या साठी खाऊ नेलेला होता , त्यांनी खुध्दा आम्हाला चहा दिला , पण तो कोरा चहा होता . सहजच कारण विचारले “आपण कोरा चहा पिता का “? उत्तर एकून मन सुन्न झाले “ आमच्या कडे गाय होती , परंतु काही दिवसांपूर्वीच ती देवा घरी गेली . म्हणून आम्ही कोरा चहा पितो “ आमची परिस्थिती गाय घेण्याची आत्ता नाही , कारण पाऊस जास्त झाला व नुकसान झाले , त्यांची लहान लहान मुले खुप गोड होती पण काय करणार आता त्यांना दुध नाही . मन सुन्न झाले आम्हाला वाटले की मेडिकल कारणाने हे कोरा चहा पित असावेत मी व आमच्या कुटुंबाने चर्चा करून गाय भेट देण्याचे ठरवले. आमच्या शेतकऱ्यांला सांगून आज गाय पोच केली . आज मनाला खुप छान वाटत आहे गो - दान केल्याचे समाधान व ते पण योग्य लाभार्थ्यांनां.
महालक्ष्मी क्रुष्णागण, देवकर पाणंद, कोल्हापूर येथे तुमच्या स्वप्नातील घराचे स्वप्न आता साकार होत आहे. आधुनिक सुविधा, उत्कृष्ट बांधकाम आणि शांत परिसरासह 1BHK व 2BHK फ्लॅट्स पझेशनसाठी तयार होत आहेत.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे प्रकल्प तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित, सोयीस्कर आणि सुंदर निवासस्थान ठरेल.
आजच भेट द्या आणि तुमचे नवीन घर निश्चित करा! 🏠✨
पत्ता:- महालक्ष्मी कृष्णांगण, मोहिते मळा , मनोरमा नगर मागे , देवकर पाणंद , निकम पार्क समोरून डाव्या हातास.